अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी मनसे आमदाराकडून अडीच लाखांची मदत

Raju Patil

कल्याण : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला आहे. राजू पाटील (Raju Patil) यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे. राम मंदिर उभारण्याच्या या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले, असे ट्विट पाटील यांनी केले .

पाटील ट्विटमध्ये म्हणाले की, आज जगभरातील सकल हिंदू समाज एकवटून अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन करून यथाशक्ती योगदान देत आहे. काल मला पण या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले. गणेश मंदिर ट्रस्टी अच्युत कराडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कल्याण जिल्हाप्रमुख अण्णा गाणार, संघ कार्यकर्ते उदय कुलकर्णी, सुरेश फाटक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला आणि प्रभू श्रीराम मंदिराची छोटी प्रतिकृती भेट दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER