भाजपच्या गोटात असलेले आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, पवारांची घेतली भेट

Rajendra Raut-Sharad pawar

पुणे : राष्ट्रवादीचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील पद्मसिंह पाटील (Padmasingh Patil) यांच्या निवडणुकीदरम्यान, बार्शी तालुक्याने भरभरुन मते दिल्याने ते निवडून आले. त्याच वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष साहेबांनी फोन करुन आभार मानले होते. विकासाची अडचण आली तर भेटत जा, असा शब्द त्यांनी दिला आहे, अशा शब्दांत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी आपली आगामी वाटचाल स्पष्ट केली आहे.

वरिष्ठ पातळीवर राजकारणात कोणत्या पक्षाचा आहे, असे पाहिले जात नाही. शहराच्या, तालुक्याच्या विकासाला महत्व दिले जाते. बार्शी शहर अन् तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांची भेट घेऊन निधी, अनुदान उपलब्ध करुन घेणार आहे असे राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राऊत हे 2019 च्या निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. आमदार झाल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. मात्र ठाकरे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ते अनुपस्थित होते. त्याच वेळी ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत की काय, अशी चर्चा होती. मात्र आपल्या घरात वैयक्तिक तातडीचे काम असल्याने आपण अनुपस्थित असल्याचे त्यांनी तेव्हा सांगितले होते. तसेच आपण तेव्हा भाजपसोबतच असल्याची ग्वाही दिली होती. आता मात्र चित्र बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपमधील किंवा भाजपला पाठिंबा दिलेले आमदार महाविकास आघाडीत येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर या घडामोडी सुरू झाल्या आहेत.

शरद पवार यांनी नुकताच सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. जुने सवंगडी पुन्हा जमविण्याची गरज त्यांनी या दौऱ्यात व्यक्त केली होती. त्यानुसार भाजपमध्ये गेलेले अनेक नेते हे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे त्यातून स्पष्ट झाले होते. त्यात कल्याण काळे यांचे नाव आघाडीवर आहे. आता राऊत राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ही बातमी पण वाचा :नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते, त्यांनी काँग्रेसबद्दल बोलू नये; थोरातांनी सुनावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER