आमदार प्रकाश आवाडे लवकरच येणार भाजपात

Prakash Awde

कोल्हापूर : माजी मंत्री व इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) भाजपामध्ये (Bjp) प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत. पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्षपद ऑफर केले आहे. आवाडे यांनी भाजपामध्ये न जाता काँग्रेसमध्ये यावे यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील आज (सोमवारी) दुपारी आवाडे यांची भेट घेणार आहेत. एका लग्नाच्या निमित्ताने एच. के. पाटील इचलकरंजीत आले आहेत.

आवाडे व खासदार गिरीश बापट यांची दोन दिवसांपूर्वी पुण्यात प्राथमिक बैठक झाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आवाडे यांची चर्चा झाल्याचे कळते. पुढील आठवड्यात फडणवीस व पक्षाचे सर्वेसर्वा अमित शहा यांच्यासोबत आवाडे यांची भेट होणार असल्याची चर्चा आहे. राजेश पाटील हे काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन आवाडे यांच्या निवासस्थानी करण्यात आले आहे. गत निवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघातून भाजपाचे आमदार सुरेश हाळवणकर यांचा पराभव करून आवाडे विजयी झाले.

त्यानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. सध्या ते आमदार असले तरी जिल्ह्याच्या राजकारणाच्या मुख्य धारेपासून थोडे बाजूला पडले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असले तरी ते विधानसभेला कोथरूड मतदारसंघातून विजयी झाल्याने कोल्हापूरच्या राजकीय घडामोडीकडे लक्ष द्यायला त्यांना मर्यादा येत आहेत. सध्या महाडिक गट भाजपामध्ये सक्रिय आहे; परंतु कोल्हापूरची जनता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. सध्याचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे चांगले काम करत असले तरी कागल विधानसभा हे त्यांचे मुख्य टार्गेट आहे. आता कोल्हापुरात महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER