सुशांत आणि दिशा प्रकरणातील ‘हा’ मुख्य दुवा ? आमदार नितेश राणेंचं गृहमंत्री अमित शहांना पत्र

NItesh rane & Amit saha

मुंबई : भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) दिशा सालियन (Disha Salian) आणि सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरण एकमेकांशी लिंक आहे, असा दावा केला आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना (Amit Saha) पत्र लिहिले आहे.

आमदार नितेश राणेंचे गृहमंत्र्यांना पत्र :

सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या हत्येचा तपास सध्या सुरू आहे. यात दिशा सालियनसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारा रोहन रॉय याची कुठलीही चौकशी मुंबई पोलिसांनी केली नाही. ज्या दिवशी दिशा इमारतीवरून खाली पडली तेव्हा तिथे रोहन रॉय उपस्थित होता. दिशा खाली पडल्यानंतरही रोहन रॉय २०-२५ मिनिटांनी फ्लॅटमधून खाली आला होता. त्यामुळे त्याच्या वागणुकीवर संशय निर्माण होतो.

रोहन रॉयने मुंबई सोडून जावं यासाठी त्याला धमकी देण्यात आली असावी. मुंबईत या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने त्याला मुंबईत येण्याची भीती वाटत असावी. कोणी तरी या प्रकरणाला रोहन रॉयवर दबाव टाकून त्याला धमकावण्याचा प्रयत्न करतंय, असा दावाही नितेश राणेंनी केला. त्यामुळे रोहन रॉयला केंद्र सरकारकडून सुरक्षा प्रदान करण्यात यावी जेणेकरून तो मुंबईत आल्यानंतर सुरक्षित राहील.

रोहन रॉय हा दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील मुख्य दुवा आहे. त्याच्या जबाबानंतर अनेक खुलासे बाहेर येतील. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरण एकमेकांशी संबंधित आहे, असे स्पष्ट मत आमदार नितेश राणेंनी पत्रात मांडले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER