
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हाव्या यासाठी आव्हान केले होते . त्यानुसार त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल 30 ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर आणखी 10 ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण 40 ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक लढणार आहेत.
राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या संकटात या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अनोखी शक्कल लढवली होती. गावांमधील निवडणुका बिनविरोध पार पाडा आणि 25 लाखांचा विकास निधी मिळवा, अशी घोषणाच निलेश लंके यांनी केली होती. बिनविरोध निवडणुका करून शासनाचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली होती. त्यामुळे यावर बैठक घेत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
निलेश लंके हे पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात आणि शासनाचा खर्च वाचावा म्हणून लंके यांनी ही शक्कल लढवली होती. तालुक्यातील जी गावे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पाडेल त्या गावाला 25 लाखांचा निधी देण्यात येईल, असे लंके यांनी सांगितले होते . त्यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला