आमदार निलेश लंके यांना जे जमते ते इतर लोकप्रतिनिधींना का जमू नये ? सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल

Maharashtra Today

पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे (Parner Assembly)आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) नावाने उभारले 1 हजार बेडचं कोविड सेंटर दुसऱ्यांदा उभारलं आहे. पिंपरी एका सामान्य कुटुंबातील नगर जिल्ह्यातील निलेश लंके या संकटमय काळात सर्वसामान्य जनतेला मदत करीत आहेत . मग लंके यांच्यापेक्षा कितीतरी मोठी क्षमता असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना ते का शक्य होत नाही, असा सवाल सामाजिक कार्यकर्त मारुती भापकर यांनी विचारला आहे.अनेक बिल्डर नगरसेवक असलेल्या श्रीमत पिपरी महापालिकेच्या हद्दीत असे एकही स्वखर्च कोविड सेंटर (Covid Center)उभे राहिले नसल्याने याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले आहे . दररोज तीन हजारावर नवे रुग्ण सापडत असून पन्नासच्या वर बळी जात आहे. वाढत्या रुग्णसख्येमुळे पिपरी चिंचवड शहरातील महापालिका व खासगी रुग्णालये फुल झाली आहेत. प्रशासन व त्याची तोकडी यंत्रणा हतबल झाली आहे. त्यामुळे कोविड रुग्ण व त्यांचे नातेवाईक ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड, रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी, नगरसेवक यांच्याकडे मदत मागत आहेत. मात्र ते फक्त पत्रकबाजीतून मागण्या करताना दिसत आहेत, असे भापकर

ही वेळ कागदी घोडे नाचवण्याची नसून प्रत्यक्ष कृती करण्याची आहे, असे त्यांनी सुनावले. यासंदर्भात ते म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक लोकप्रतिनिधी बाधकाम व्यावसायिक

असून त्याच्या पाचशे, हजार फ्लॅटच्या स्कीम शहरात सुरू आहेत. तर, काहींची मोठमोठी मंगळ कार्यालये आहेत. या स्कीम आणि मगल कार्यालयात स्वखर्चाने कोविड़ सेंटर सुरू करूइच्छितो. त्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी, असा पुढाकार घेताना मात्र कोणीही दिसत नाही, हे खेदजनक आहे. त्यामुळे या लोकप्रतिनिधींचे मतदार सध्या रामभरोसे आहेत. त्याच्याजीविताला धोका निर्माण झाले असल्याचे भापकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button