चिपळूणच्या वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाला मंजुरीची आमदार निकम यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

MLA Nikam-Laxminarayan Mishra

रत्नागिरी/प्रतिनिधी: चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीमध्ये जागोजागी प्रचंड प्रमाणात साचलेला गाळ उपसायला तांत्रिक मंजुरी देण्याची मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

वाशिष्ठी नदीतील गाळ उपसला गेला नाही, तर दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात शहरात पाणी भरून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाळ उपसण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध होणे व गाळ काढण्याच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळणे आवश्यक आहे. येत्या पावसाळ्यात शहरामध्ये पाणी शिरून लगतची बाजारपेठ, बस डेपो, शाळा, कॉलेज परिसरात नुकसान होऊ शकते. गेल्या पावसाळ्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी या नदीमधील गाळ उपसणेगरजेचे आहे. त्यासाठी गाळ काढण्याच्या कामाला त्वरित तांत्रिक मंजुरी देऊन निधी उपलब्ध करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात निकम यांनी लिहिले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER