जे पवारसाहेबांवर बोलताहेत त्यांची वैचारिक पात्रता काय? आमदार निलेश लंके टीकाकारांवर धडाडले

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी त्यांच्या समर्थनार्थ आवाज उठविला आहे. जे नेते शरद पवारसाहेबांवर आक्षेप घेऊन टीका करताहेत, त्यांची वैचारिक पात्रता काय? असा सवाल करत ज्या नेत्याने संसदीय राजकारणात ५० वर्षांपेक्षा जास्त काळ घालवला आहे, त्या नेत्यावर टीका करताना आपण काय बोलले पाहिजे, त्याचे भान भाजप नेत्यांना राहिलेले नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी दिले आहे.

जेजुरीतील अहल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शरद पवारांच्या एका वक्तव्यावरून टीका होऊ लागली. याच टीकाकारांना आमदार लंके यांनी सुनावलं. राजकीय कारकीर्द ५० वर्षे पूर्ण करणाऱ्या शरद पवारसाहेबांवर हेतुपुरस्सर  दिशाहीन झालेले लोक टीका करतात. जेजुरी येथे झालेल्या कार्यक्रमात पवारसाहेबांनी जे वक्तव्य केलं, त्याचा चुकीच्या पद्धतीने विपर्यास केला जात असल्याचं लंके यांनी म्हटलं.

देशाचे नेतृत्व करत असताना त्यांच्याइतका राजकीय, सामाजिक आणि ऐतिहासिक अभ्यास कोणाचाही नाही. जे त्यांच्यावर टीका करतात त्यांची वैचारिक पातळी घसरली आहे, अशी टीका त्यांनी केली. त्याचबरोबर पूजनीय अहल्याबाई होळकरांचा सखोल अभ्यास पवारसाहेबांइतका टीकाकारांचा नाही. त्यामुळे राज्यातील सर्व टीकाकारांनी त्यांच्यावर आरोप करणे थांबवावेत, असे लंके म्हणाले.

ही बातमी पण वाचा : पवारांचे मिशन केरळ : पक्षविरोधी काम करणा-या आमदाराची केली हकालपट्टी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER