कोरोना विरोधात राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके मैदानात ; पाठीवर पंप…. हातात स्प्रे…

Nilesh Lanke

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर घराबाहेर पडू नका, बाहेर गर्दी करू नका अशा सूचना राज्य सरकारकडून वारंवार देण्यात येत आहेत.यापार्श्वभूमीवर अनेक लोकप्रतिनिधींनी स्वतःला लॉकडाऊन करून घेतले आहे. काहीजण समाजमाध्यमांवर बंद घरातून व्हिडिओ व्हायरल करीत आहेत. मात्र पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेचे आमदार निलेश लंके हे या महामारी विरोधात स्वतः मैदानात उतरले आहेत.

कोरोना नावाच्या विषाणू विरोधात त्यांनी एक प्रकारे युद्धचं पुकारले आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस त्याचबरोबर इतर यंत्रणा आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. आपणही जनतेचा सेवक आहे. आज माझ्या मतदारसंघातील मायबाप जनता अडचणीत आहे. असे असताना मी हातावर हात देऊन बसू शकत नाही. अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी नोंदवली.

लंके स्वतः प्रत्येक गावात प्राथमिक आरोग्य केद्रांत जाऊन तिथल्या सोयीसुविधा तपासाहेत. गावात बाहेरून म्हणजे मुंबई पुणे येथून आलेल्या चाकरमानी आणि व्यवसायिकांची आकडेवारी घेत आहेत. बाहेरच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील कामगार मजूर यांची राहण्याची जेवणाची सोय करून देत आहेत.

दरम्यान गेली तीस वर्ष 24 तास 365 दिवस लोकसेवा करीत असलेल्या निलेश लंके या सर्वसामान्य युवकाला खिशात एक रुपया नसताना जनतेने आमदार केले. लोकहीत उरी बगळणाऱ्या आणि जनसेवा हेच आपले जीवन मानणाऱ्या आमदार निलेश लंके यांनी कमी दिवसातच आपल्या कर्तुत्वाची छाप महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडली आहे. आ. लंके यांनी गेल्या काही दिवसात कोरोना सारख्या महाभयंकर रोगा विरोधात ज्या पद्धतीला प्रत्यक्ष लढाई सुरू केली आहे. यावरून ते खऱ्या अर्थाने लोकांचे आमदार आहेत हे स्पष्ट झाले आहे.


Web Title : mla mr nilesh lanke doing work for fight against corona

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)