आमदार जोरगेवार यांनी एका रात्रीत पोलिसांना पकडून दिली १ कोटीची दारू !

Kishor Jorgewar

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे पण दारूचा धंदा जोरात सुरू आहे. याबाबत आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनीही पोलीसांकडे तक्रारी केल्या होत्या पण, पोलीस लक्ष देत नव्हते. म्हणून जोगेरवार यांनीच मांगवारी रात्री बेकायदा दारू पकडण्याची मोहीम सुरू केली. पोलिसांना एका रात्रीत १ कोटींची दारू पकडून दिली!

चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेली अवैध दारूची वाहतूक थांबवून अवैध दारूविक्रीवर कारवाई करा असे निवेदन किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले होते. त्यानंतर जोरगेवार यांना अवैध दारू विक्रेत्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. शहरात दारूचे ट्रकच्या ट्रक येत आहेत. जोरगेवार यांनी मंगळवार (१९ जानेवारी)च्या रात्री चंद्रपुरात येणारी अवैध दारूची ७ वाहन पकडली.पोलिसांना माहित दिली. दारूची वाहतूक करणारेय वाहने पडोली पोलीस ठाण्यात जमा केली. या सात वाहनांमध्ये एक पायलट वाहन होते. त्याचे काम शहरात जाण्याचा मार्ग सुरळीत करून सावधान करणे होते!

सहा गाड्यांमध्ये दारूचा १७०० ते २००० पेट्या होत्या. वाहन व अवैध दारू असा एकूण १ कोटी रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. स्व:त आमदारानेच दारू वाहतुकीवर कारवाई केल्याने पोलिसांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे.

जोरगेवार यांनी अवैध दारूची वाहने पकडली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली. मात्र त्यांनी आमदारांनाच उडवाउडवीची उत्तरे दिली, अशी चर्चा आहे.

ही अवैध दारू गुप्ता नावाच्या व्यवसायिकाची असल्याची माहिती आहे. या गुप्ताने काही दिवसांपूर्वी रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला केला होता, हे उल्लेखनीय. आमदार जोगेरवार यांनी दारू पकडल्याची माहीत दिल्यानंतर लगेच पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोचलेत, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रकारांना सांगितले!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER