संभाजीराजे पाठिंबा द्या, १२ हत्तींचं बळ मिळेल; गोपीचंद पडळकरांचे पत्र

Gopichand Padalkar - Sambhaji Raje Chhatrapati

मुंबई : सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजाने (Maratha Community) आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही वारंवार समोर येत आहे. धनगर समाजाच्या (Dhangar Community) आरक्षण मागणीला पाठिंबा देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांना विनंती केली आहे. यासाठी पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पत्र पाठवून पाठिंब्याची विनंती केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पडळकर यांनी खासदार संभाजीराजे यांना लिहिले पत्र :

मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणालाही पाठिंबा द्या, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. इतंकच नाही तर पाठिंबा दिल्यास समाजाच्या लढ्याला १२ हत्तींचं बळ येईल, असंही पडळकरांनी पत्रात म्हटलं आहे. आरक्षणाच्या अभ्यासाचा आणि रोखठोक भूमिकेचा धनगर आरक्षणासाठी उपयोग व्हावा, अशी अपेक्षा यावेळी पडळकर यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER