आमदार गोपीचंद पडळकर कोरोनामुक्त; चाहत्यांनी जेसीबीतून उधळली 100 पोती फुले

Gopichand Padalkar

पंढरपूर : भाजपचे (BJP) विधान वरिषदेचे आमदार गोपीचंद (Gopichand Padalkar) पडळकर हे कोरोनामुक्त झाल्चायाच्हया आनंदात त्यांच्यावर जेसीबीतून 100 पोती फुलांचा वर्षाव करण्यात आला.

पंढरपुरमधील रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळताच चाहत्यांनी त्यांच्यावर जेसीबीतून फुले उधळत स्वागत केले. गुलाब, झेंडू, निशिगंध, शेवंती अशा 100 पोती फुलांचा त्यांच्यावर वर्षाव करण्यात आला.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार गोपीचंद पडळकर कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर पडळकर यांनी पंढरपुरात येऊन हॉस्पिटलमध्ये उपचारसुरू केले.

पडळकर यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. उपचारादरम्यान पडळकर यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पंढरपुरातील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER