मिरा भाईंदरमध्ये पुढचा महापौर शिवसेनेचाच, पक्षप्रवेशानंतर आमदार गीता जैन यांचा एल्गार

MLA Geeta Jain

मुंबई :- मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विकासकामाच्या आश्वासनामुळे मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. बंडखोर म्हणून मी निवडून आले, पण मी भाजपला समर्थन दिलं होतं. परंतु पक्षश्रेष्ठींकडून वचनपूर्तता झाली नाही, अशी खंत आमदार गीता जैन (Geeta Jain) यांनी व्यक्त केली आहे.

नुकतेच त्यांनी मातोश्रीवर मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

यावेळी, मिरा भाईंदरमध्ये पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल, असा एल्गार आमदार गीता जैन यांनी शिवसेना प्रवेशानंतर केला. तर मिरा भाईंदर महापालिकेत एकहाती सत्ता आणण्याचा विश्वास शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

गीता जैन म्हणाल्या, माझ्या प्रवेशामुळे भाजपला धोका आहे की नाही, ते भाजपने ठरवावं. तसेच त्यांनी सांगितले की, मिरा-भाईंदरमधील भाजपचे अनेक नगरसेवक संपर्कात आहेत. वेळ आल्यावर ते शिवसेनेत प्रवेश करतील. पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मिरा भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकद 22 नगरसेवकांची आहे. गीता जैन यांच्या प्रवेशामुळे पक्षवाढीसाठी आणखी बळ मिळेल. भाजपला काय फटका बसतो, हे पुढच्या काळात पाहायला मिळेल, असे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER