आमदार गणेश नाईकांच्या नातवाला मारहाण, एकाला अटक तर तिघांचा शोध सुरू

Ganesh Naik - Maharastra Today

नवी मुंबई : नवी मुंबईचे नेते आणि भाजप (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या नातवाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिघांचा शोध सुरु आहे. माळशेज घाटाच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश नाईक यांचा नातू संकल्प संजीव नाईक व त्यांचे मित्र तेजेंद्रसिंग हरजितसिंह मंत्री हे दोघे कृषी केंद्र शोधण्यासाठी माळशेज घाटाच्या दिशेने जात होते. तळवली गावाजवळ आले असता तेथून त्यांनी गाडी पुन्हा मागे फिरवली. त्याचवेळी पाठीमागून आलेला दुचाकीस्वार धडकला. दरम्यान, तेथे असलेल्या नीलेश देसले व त्याच्या तीन साथीदारांनी संकल्प, तेजेंद्रसिंग यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

याप्रकरणी निलेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर तिघांचा शोध सुरु आहे. याबाबत टोकावडे पोलीस ठाण्यात १०८/२०२१ भदविस कलम ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तेजेंद्रसिंग मंत्री यांच्या गळ्यातील सव्वातोळ्याची सोन्याची चैन गहाळ झाली आहे. सध्या याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER