रितेशवर अधिक प्रेम आणि आवडता सिनेमा आहे…

Dheeraj Deshmukh-Ritesh Deshmukh
Dheeraj Deshmukh-Ritesh Deshmukh

मुंबई : महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. यावेळी संगीतकार अवधूत गुप्ते यांनी धीरज देशमुखांचं कुठल्या भावावर जास्त प्रेम आहे असा प्रश्न विचारला. यावर रितेश देशमुख असं प्रामाणिकपणे रोखठोक उत्तर महाविकास आघाडीचे मंत्री धीरज देशमुख यांनी दिलं. तसेच आवडता सिनेमा कोणता, तुझे मेरी कसम की लय भारी यावर लय भारी हा आवडता सिनेमा असल्याचे देशमुख म्हणाले.

धीरज देशमुख यांनी सांगितली त्यांच्या राजकारणाची दिशा –

माझा एक भाऊ राजकारणात आहे एक बॉलिवूडमध्ये आहे. मात्र या दोन्ही फिल्डमध्ये लोक ठरवतात, की तुम्ही टिकणार की नाही. या फिल्डमध्ये यायचं हे आपण ठरवतो, तिकीट पक्ष देतो, पण निवडून द्यायचं की नाही हे लोक ठरवतात. लातूरच्या लोकांनी ठरवलं, मी राजकारणात यायचं आणि मी निवडून आलो”, असं धीरज देखमुख म्हणाले.

माझे बाबा माझेच नाही, तर अनेकांचे हिरो : धीरज देशमुख