नियमांना झुगारत शिवसेना-राष्ट्रवादी पुरस्कृत आमदाराची थेट मंदिरात जाऊन पूजापाठ

mla-chandrakant-patil-in-shilsala-hanuman-mandir

भुसावळ : राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र सहा महिन्यांपासून सर्व उद्योगधंदे आणि रोजगार बंद असल्याने राज्य सरकारनं मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनलॉक-५ वा टप्पा सुरू केला आहे. या टप्प्यात राज्य सरकारनं आणखी काही नियम शिथिल केले आहे. राज्यात हॉटेल, बार, रेस्टॉरंट येत्या ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मात्र, राज्यात अद्याप ‘देऊळ बंद’च आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे शिवसेना-राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारने कुठलीही परवानगी दिली नसताना आपल्या कार्यकर्त्यांसह थेट मंदिरात प्रवेश करून पूजापाठ केल्याचं समोर आलं आहे.

बोदवड तालुक्यातील शिरसाळा हनुमान मंदिर शासनाच्या नियमानुसार अदयाप बंद आहे. मात्र, आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत थेट मंदिरात प्रवेश केला. एवढंच नाही तर शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लवकर कोरोनामूक्त होण्यासाठी आमदार पाटील यांनी पूजापाठ केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER