राष्ट्रवादीच्या आमदाराच स्तुत्य कार्य, क्वारंटाईनसाठी सोडला स्वतःचा राहता दुमंजीला बंगला

mla-bharat-bhalke-give-his-own-house-for-quarantine

सोलापूर : सोलापूरनंतर आता पंढरपुरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता. पंढरपूरचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांनी आज आपला राहता बंगला लोकांसाठी खाली करुन देणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयाजवळ असलेला त्यांचा दुमजली बंगला क्वारंटाईनसाठी देणार असल्याचं जाहीर केले आहे. तश्या आशयाचं पत्रदेखील त्यांनी प्रशासनाला पाठवले आहे. यापूर्वी शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनीही त्यांचं घर क्वारंटाईनसाठी दिलं होतं.

बाहेरून येणाऱ्या लोकांना चांगलं क्वारंटाईन सेंटर उपलब्ध व्हावे यासाठी सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा एका आमदाराने लोकांसाठी आपला राहाता बंगला खाली करुन देण्याचे जाहीर केले आहे. आमदार भालके यांच्या सामाजिक दातृत्वाचे कौतुक केले जात आहे. या दुमजली बंगल्यामध्ये जवळपास १०० हून अधिक बेड बसतील. यासाठी लागणारे सर्व साहित्य देखील आपण उपलब्ध करुन देणार आहे. या ठिकाणी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांसाठी देखील सर्व सुविधा पुरवल्या जाईल, असंही भालके यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER