धनंजय मुंडे यांच्याबाबत विरोधकांनी राजकारण करू नये : अमोल मिटकरी

Dhananjay Munde-Amol Mitkari

मुंबई :- रेणू शर्मा या तरूणीने राष्ट्रावादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.

मुंडे यांच्याबाबत विरोधकांनी राजकारण करू नये. आम्ही बोलायला लागलो, तर पळता भुई थोडी होईल, असा इशारा आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी रविवारी इस्लामपूर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये नाव न घेता भाजपला दिला.

राजारामबापू पाटील साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटीलही (Jayant Patil) यावेळी उपस्थित होते .

गावागावात लोक रामराम करून परस्पराबाबत आदर व्यक्त करतात. मात्र काही लोक श्रीराम नारा देत दहशत कशाला माजवत आहेत, असा सवाल करून ते म्हणाले, स्व. बापूंनी कारखाना कार्यस्थळावर राम मंदिर बांधून सर्व समावेशक रामाचा संदेश दिला आहे. सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांच्यावर हनीट्रपचा प्रयोग झाला आहे. मात्र याचेच भांडवल करून कोणीही राजकारण करू नये, आमच्याकडेही कुंडल्या आहेत. वेळ आली तर त्याचाही उलगडा केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मंत्री पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण निर्मिती करण्यात आ. मिटकरी, खा. डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचे योगदान मोलाचे आहे. आम्ही एकत्रित संपूर्ण राज्यात फिरलो, त्यांचे प्रत्येक भाषण ऐकावेसे वाटायचे. आशय तोच, मात्र सांगण्याची ढब वेगवेगळी असायची, असे ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : विधानसभेनंतर ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या नेत्याला धक्का

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER