सौंदर्य खुलविण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ पदार्थ

bath

आपले खरे सौंदर्य आपल्या शारीरिक स्वच्छतेवर आणि प्रसन्नतेवर आधारित असते आणि या गोष्टी मिळतात त्या स्नानाने. स्नान या शब्दाचा अर्थ फक्त साबण लावून पाणी ओतणे हा नसून यात संपूर्ण शरीराची स्वच्छता होणे अपेक्षित आहे. त्यासाठी नैसर्गिक साधनांचा वापर करून आंघोळ करावी.

  • तुरटी आणि काळे मीठ :- एक बकेट पाण्यात एक-एक चमचा तुरटी आणि काळे मिसळून अंघोळ करा. यामुळे बॉडीचे ब्लड सर्कुलेशन सुधारेल, ज्यामुळे स्ट्रेस आणि मसल्स पेन दूर होईल.

  • लिंबाची पाने :- एक ग्लास पाण्यात ८-१० लिंबाचे पाने उकळा. गार झाल्यानंतर गाळून घ्या. हे एक बकेट पाण्यात मिसळून अंघोळ करा. स्किन इन्फेक्शन आणि सूज दूर होईल.

mix substance

ही बातमी पण वाचा : सौंदर्यासाठी ‘हे’ व्हिटॅमिन्स उपयुक्त

  • गुलाब जल :- एक बकेट पाण्यात ३-४ चमचे गुलाब जल मिसळून अंघोळ करा. यामुळे मसल्स रिलॅक्स होतील, यासोबतच बॉडीची दुर्गंधी दूर होईल.

  • संत्रीचे साल :- एक बकेट कोमट पाण्यात दोन संत्रींचे साल टाका. दहा मिनिटानंतर हे काढून अंघोळ करा. यामुळे मसल्स पेन आणि स्किन इन्फेक्शन दूर होईल.

  • कापूर :- एक बकेट पाण्यात कापूराचे २-३ तुकडे टाकून मिसळा. याने अंघोळ केल्याने बॉडी रिलॅक्स होते आणि डोकेदुखीची समस्या दूर होते.

  • हळद :- एक चमचा कच्च्या हळदीची पेस्ट बनवा. हे एक बकेट पाण्यात मिसळून अंघोळ करा. स्किन डिसिजचा धोका टळेल.

  • चंदन :- रात्री झोपण्याअगोदर एक वाटी पाण्यात चिमुटभर चंदन टाकून ठेवा. सकाळी हे एक बकेट पाण्यात मिसळून अंघोळ करा. यामुळे स्किन इन्फेक्शन दूर होईल.