मिथुन चक्रवर्तीच्या मुलावर बलात्काराचा आरोप; पत्नीविरोधातही तक्रार

mithun chakraborty Wife ANd son

मुंबई : बलात्कार व फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका महिलेने महाक्षय व मिथुन यांच्या पत्नीवर बलात्कार, फसवणूक आणि जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे.

तरुणीने तक्रारीत म्हटले आहे की, २०१५ पासून पीडित तरुणी आणि महाक्षय एकमेकांना ‘डेट’ करत होते. महाक्षय उर्फ मेमोने २०१५ मध्ये पीडितेला घरी बोलावले व शीतपेयातून नशेच्या गोळ्या दिल्या. तिच्यावर बलात्कार केला. तिला लग्नाचे आमिष दाखवले. या काळात त्याने वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तरुणी गर्भवती राहिली. मात्र, त्यानंतर मेमोच्या आईकडून पीडितेला गर्भपात करण्याची धमकी देण्यात आली.

तरुणीने गर्भपात करण्यास नकार दिला. त्यानंतर मेमोने पीडितेला काही गोळ्या खायला दिल्या. ज्यामुळे तिचा गर्भपात झाला, असा आरोपही तिने केला. विशेष म्हणजे याप्रकरणी पीडिता तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र, तिची तक्रार नोंदवून घेतली नाही असे तिने फिर्याद देताना सांगितले. त्यानंतर मेमो आणि मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी यांनी पीडितेला धमक्या देण्यास सुरुवात केली.

दरम्यान, पीडित तरुणी दिल्लीला गेली. रोहिणी कोर्टात या प्रकरणी याचिका दाखल केली. कोर्टाकडून प्राथमिक पुराव्यांच्या आधारे एफआयआर दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत. ओशिवरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER