‘मी कोबरा आहे’ मिथून चक्रवर्तीच्या डायलॉगचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mithun Chakraborty

मुंबई : अभिनेते मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी रविवारी (७ मार्च) रोजी भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला. नंतर कोलकात्याच्या ब्रिगेड ग्राउंडवर आयोजित सभेत त्यांनी तृणमूल काँग्रेसवर (Trinamool Congress) आक्रमण केले. म्हणालेत, “आमचा हक्क हिसकावला तर खबरदार, मी कोबरा आहे” त्यांचा हा डायलॉग सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. अनेक युजर्सने त्यांची खिल्ली उडवली आहे.

याबाबत सोशल मीडियावर आलेल्या जास्त प्रतिक्रिया या मिथून यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवणाऱ्या आहेत. या वक्तव्यानंतर अवघ्या काही तासातच ट्विटरवर कोबरा आणि मिथून चक्रवर्ती ट्रेंडमध्ये आले. “आपले अभिनेते कोबरा आहेत. हे आम्हाला आज माहिती पडलं”, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या.

भाषण
मिथुन संक्षिप्त भाषणात म्हणाले होते – “मी १८ वर्षांचा होतो. तेव्हापासून गरिबांना मदत करावी असे मला वाटत होते. आज माझे हे स्वप्नही पूर्ण झाले आहे. कुणाचा अधिकार हिसकावून घेतला जात असेल तर मी त्यासाठी उभा राहिल. मी एक नंबरचा कोब्रा आहे. दंश मारला तर फोटो बनून जाल, अशा इशारा मिथून चक्रवर्ती यांनी दिला. “बंगाली असल्याचा मला अभिमान आहे. मी संपूर्णपणे कोब्रा आहे”, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER