मिथुन चक्रवर्ती भाजपात येणार

Mithun Chakraborty-BJP

बंगाल :- पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी बंगालमध्ये परिचित चेहऱ्याच्या शोधात असलेल्या भारतीय जनता पार्टीसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जेष्ठ बंगाली व हिंदी अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) भाजपात (BJP) प्रवेश करणार आहे. ७ मार्चला मिथुनचा भाजपात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबई येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. गेल्या वर्षी नागपूरमध्ये मिथून यांनी भागवत यांची भेट घेतली होती, त्यावेळी भागवतांना त्यांनी घरी येण्याचं आमंत्रण दिले होते. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेली ही भेट खूप महत्त्वपूर्ण मानली जात होती.

ही बातमी पण वाचा : गुजरात स्थानिक निवडणुकीतही भाजपचे वर्चस्व; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER