कोट्यवधींचा मालक आहे मिथुन चक्रवर्ती

Mithun Chakraborty

बॉलिवूडमधील (Bollywood News) कलाकार कोट्यवधींची कमाई करतात पण म्हातारपणासाठी तजवीज करून ठेवत नाहीत, तर दुसरीकडे काही कलाकारांनी म्हातारपणाची सोय व्यवस्थित करून ठेवली असल्याचे काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला सांगितले होते. म्हातारपणाची सोय करणाऱ्या कलाकारांमध्ये मिथुन चक्रवर्तीचा (Mithun Chakraborty) नंबर फार वरचा आहे. तो अभिनय करीत होता तेव्हाच त्याने उटीमध्ये स्वतःच्या मोनार्क हॉटेलची चेन सुरु केली होती. 80 च्या दशकात बहुतेक सिनेमांचे शूटिंग उटीला होत असल्याने मिथुनचे हॉटेल सतत भरलेले असायचे. हिंदीप्रमाणेच साऊथमध्येही मिथुनने अनेक सिनेमे केले आणि विशेष म्हणजे त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिटही होत असत. तो अजूनही सिनेमात काम करीत आहे. त्यामुळेच मिथुनकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.

1976 मध्ये मिथुनने ‘मृगया’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. या सिनेमासाठी त्याला उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मिथुनने आतापर्यंत 350 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले असून 2014 मध्ये तो ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसतर्फे राज्यसभेवरही गेला होता. मात्र दोन वर्षातच त्याने राज्सभेचा राजीनामा दिला होता. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) प्रेमाखातर त्याने पुन्हा राजकारणात उडी घेतली आहे. तो निवडणुक लढवणार की नाही हे अजून नक्की झालेले नाही. बॉलिवूडमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिथुन चक्रवर्ती जवळपास 300 कोटींचा मालक आहे. 2012-13 मध्ये मिथुनचे वार्षिक उत्पन्न 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. तर पत्नी योगिता बालीचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये होते. मिथुन जेव्हा ऐन भरात होता तेव्हा तो सगळ्यात जास्त इनकम टॅक्स भरणारा एकमेव बॉलिवूड स्टार होता. आणि विशेष म्हणजे सलग चार वर्षे तो टॅक्स भरण्यात पहिल्या क्रमांकावर होता.

मिथुनकडे शेतजमीन, व्यावसायिक आणि निवासी इमारत असून त्याच्याकडे 5 कोटी रुपयांच्या कार्स आहेत. यात मर्सिडीज, फॉक्सव्हॅगन, इनोव्हा फॉर्च्यूनर गाड्यांचा समावेश आहे. मुंबईत त्याचे दोन बंगलेही आहेत. मिथुन अजूनही सिनेमात कार्यरत असून नुकताच तो विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ आणि रामगोपाल वर्माच्या ‘12 ओ क्लॉक’मध्येही दिसला होता. मिथुनचा मोठा मुलगा महाक्षय बॉलिवूडमध्ये आला पण तो यशस्वी झाला नाही. आता त्याचा छोटा मुलगा नामाशी चक्रवर्ती ‘बॅड बॉय’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.

ही बातमी पण वाचा : पहिल्याच सभेत मिथुनचा कोब्रा शत्रुघ्न सिन्हाला आवडला नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER