अखेर मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपात प्रवेश!

Mithun Chakraborty join BJP

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या तारखा जवळ आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी केली. आज बंगालमध्ये ‘सुपर संडे’ पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कोलकाताच्या ब्रिगेड परेड मैदानात एका सभेला संबोधित केले. मोदी यांच्या सभेत अभिनेते मिथुन चक्रवर्ती उपस्थित होते. मिथुन चक्रवर्ती(Mithun Chakraborty) आज भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता होती.

कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राउंडमध्ये नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित केली. पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी आज सकाळी मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती.

कैलास विजयवर्गीय हे मिथुन चक्रवर्ती यांच्या बेल्गाचिया येथील निवासस्थानी गेले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. तेव्हा मिथुन चक्रवर्ती आज भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER