मितालीचे सामने सर्वाधिक आणि कारकीर्दही सर्वांत मोठी

भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) ही सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारी महिला खेळाडू ठरली आहे. लखनौ येथे खेळला जात असलेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा वन डे सामना हा तिच्या कारकिर्दीतला ३१० वा सामना आहे. यात १० कसोटी, २११ वन डे आणि ८९ टी-२० सामने आहेत आणि एवढे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी दुसरी कोणतीही महिला क्रिकेटपटू नाही.

एकूण सामन्यांच्या बाबतीत मितालीने इंग्लंडच्या शॉर्लेट एडवर्डस् हिला मागे टाकले. शॉर्लेटने ३०९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिसऱ्या स्थानी २६२ सामन्यांसह झुलन गोस्वामी आहे. इंग्लंडचीच जेनी गन ही २५९ तर ऑस्ट्रेलियन अॕलेक्स ब्लॕकवेल ही २५१ आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे.

खेळाडू — कसोटी — वन डे — टी-२०
मिताली — १० ——– २११ —- ८९
शाॕर्लेट —- २३ ——– १९१ —- ९५
झुलन —- १० ——– १८४ —- ६८

याशिवाय महिला क्रिकेटपटूंमध्ये सर्वांत प्रदीर्घ कारकीर्द केवळ मितालीचीच आहे. २१ वर्षे २५६ दिवस एवढी तिची लांबलचक कारकीर्द आहे आणि १९९०, २०००, २०१० आणि २०२० या चार दशकांमध्ये किमान एक तरी वन डे सामना खेळलेली ती एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. पुरुषांमध्येही केवळ सचिन तेंडुलकरच एवढा दीर्घकाळ खेळलाय.

सर्वांत  लांब वन डे कारकीर्द

सचिन तेंडुलकर – २२ वर्षे ९१ दिवस
मिताली राज —– २१ वर्षे २५६ दिवस
सनथ जयसूर्या — २१ वर्षे १८४ दिवस
जावेद मियांदाद – २० वर्षे २७२ दिवस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER