मितालीचे आता दस हजारी राज्य

पाचआकडी धावा करणारी दुसरीच महिला क्रिकेटपटू

Mithali Raj completes 10000

भारताच्या क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पाच आकडी धावा करणारी केवळ दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे आणि लवकरच महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय करण्याचा विक्रम तिच्या नावावर असेल. सद्यस्थितीत इंग्लंडच्या (England) शॉर्लेट एडवर्डस् (Charollete Edwards) हिच्या नावावर सर्वाधिक 10273 धावा आहेत आणि मिताली राजच्या नावावर 10001 धावा आहेत.दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या तिसऱ्या वन डे सामन्यात लखनऊ येथे 36 धावांची खेळी करताना शुक्रवारी तिने हा टप्पा गाठला.

याच्या आदल्याच सामन्यात मिताली ही सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारी महिला खेळाडू ठरली होती. ती आतापर्यंत 311 सामने खेळलेली आहे. यात 10 कसोटी, 212 वन डे आणि 89 टी-20 सामने आहेत आणि एवढे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी दुसरी कोणतीही महिला क्रिकेटपटू नाही. याबाबतही तिने शॉर्लेट एडवर्डस् हिलाच मागे टाकले. एडवर्डस 309 आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे.

26 जून 1999 रोजी आपली पहिली आंतरराष्ट्रीय धाव घेतलेल्या मितालीने आता 38 वर्षे वयात अॕनी बाॕश्च हिला चौकार लगावून 10000 धावांचा टप्पा ओलांडला. पण त्याच्या पुढल्याच चेंडूवर ती झेलबाद झाली. तिने 50 चेंडूत 36 धावा केल्या.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिताली राज व शॉर्लेट एडवर्डसने केलेल्या धावा

सामने — मिताली —- शॉर्लेट
कसोटी — 663 —– 1676
वन डे —- 6974 —- 5992
टी-20 — 2364 —- 2605

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आघाडीच्या महिला फलंदाज

शॉर्लेट एडवर्डस् – 10273 धावा
मिताली राज —– 10001 धावा
सुझी बेटस् ——- 07849 धावा
स्टेफनी टेलर —– 07816 धावा
मेग लॕनिंग ——– 06900 धावा

शॉर्लेटने 2016 मध्ये 10000 धावांचा टप्पा गाठला होता. योगायोगाने तो सामनासुध्दा दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतील तिसरा सामना होता आणि मालिका 1-1 अशी बरोबरीवर होती. आतासुध्दा नेमकी तशीच स्थिती आहे. योगायोगाने शॉर्लेट व मिताली या दोघींनीही चौकारासह हा टप्पा गाठला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER