मिताली राज नाबाद 20 वर्ष 105 दिवस

Mithali Raj

भारतीय महिला वन डे क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ही 20 वर्षांपेक्षा अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. 1999 मध्ये पदार्पण केल्यानंतर आज दक्षिण आफ्रिकेविरुध्द बडोदा येथील सामन्यात खेळताना तिने हा विक्रम केला.

ही बातमी पण वाचा:- देवा, विराट कोहलीला ‘टॉस’ जिंकू दे!

तब्बल 20 वर्ष 105 दिवसांपूर्वी ती पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळली होती.

महिलांमध्ये तर एवढी प्रदीर्घ कारकिर्द तर कुणाचीच नाही आणि पुरुषांपैकी सचिन तेंडूलकर, सनथ जयसुर्या व जावेद मियांदाद यांच्यानंतर मितालीची कारकिर्द सर्वात लांबची आहे.

याकाळात दोनशेच्या वर वन डे सामने खेळलेली ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. याप्रकारच्या क्रिकेटमध्ये 183 डावात सर्वाधिक 6720 धावा तिच्या नावावर आहेत. याशिवाय 10 कसोटी सामन्यांत तिने 663 धावा केल्या आहेत आणि 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यावर तिने टी-20 मधून निवृत्ती पत्करली आहे. यातही 2364 धावा तिच्या नावावर आहेत. भारतासाठी वन डे सामन्यात सर्वात कमी वयात (16 वर्ष 205 दिवस) शतक करण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. 2004 ते 2013 दरम्यान सलग 109 सामने खेळण्याचाही विक्रम तिच्या नावावर आहे आणि 2004 मध्ये ती भारतीय महिला संघाची सर्वात कमी वयाची कर्णधार ठरली होती.

प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्द राहिलेले क्रिकेटपटू

22 वर्ष 91 दिवस-.सचिन तेंडूलकर
21 वर्ष 184 दिवस- सनथ जयसूर्या
20 वर्ष 272 दिवस- जावेद मियांदाद
20 वर्ष 105 दिवस-.मिताली राज
19 वर्ष 195 दिवस- क्लेयर शिलिंग्टन
19 वर्ष 42 दिवस- यान ब्रिटीन