अधिकाऱ्यांच्या हातातून चुका होत असतात, घटना घडत राहतात; गृहमंत्री देशमुखांचं विधान

Anil Deshmukh

मुंबई : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाने कोरोना (Corona) काळात अतिशय उत्तमरित्या काम केले आहे, पोलीस दिवसरात्र मेहनत घेत होते, देशात महाराष्ट्र पोलिसांची चांगली प्रतिमा आहे. काही अधिकाऱ्यांच्या हातून चुका होतात, त्या यापुढे होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल असं सांगत त्यांनी सचिन वाझे प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं, परंतु या प्रकरणामुळे आपण राजीनामा देणार का? या प्रश्नावर त्यांनी थेट नाही असं उत्तर दिलं, माझा राजीनामा घेतला जाणार नाही, घटना घडत राहतात असं देशमुखांनी म्हटलं आहे.

या सगळ्या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखही जबाबदार आहेत असा आरोप भाजपाने (BJP) केला होता. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे तशी सरकारमधील काही नेत्यांनीही अनिल देशमुखांना गृहमंत्री पदावरून हटवावं अशी मागणी केली आहे, त्यामुळे अनिल देशमुख यांच्या गृहमंत्रिपदावर टांगती तलवार आहे, देशमुख यांचे गृहमंत्री पद पुढील वर्षभर कायम राहणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, तेव्हा अनिल देशमुखांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, जोपर्यंत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदेश आहे तोपर्यंत मी गृहमंत्री राहणार आहे. अलीकडेच दिल्लीत पत्रकार परिषदेत शरद पवारांनी अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत असं त्यांनी सांगितलं आहे, त्यामुळे माझं गृहमंत्रीपद जाणार नाही हे नक्की असल्याचा विश्वास अनिल देशमुखांनी व्यक्त केला.

विरोधी पक्ष भाजपा सत्ता गेल्याने इतके अस्वस्थ आहेत की अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress – NCP) आणि शिवसेनेची (Shiv Sena) सत्ता आहे ते त्यांना खरं वाटतं नाही, भाजपा मंगुरीलाल के सपने पाहत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) स्थिर आहे, कोणीही किती प्रयत्न केले तरीही सरकार पडणार नाही, महाविकास आघाडीत चांगल्या पद्धतीन समन्वय ठेऊन काम करतेय, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना सरकार २ महिन्यात पडणार, ३ महिन्यात पडणार असं बोलावं लागतं असं सांगत अनिल देशमुखांनी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER