धुळ नियंत्रणासाठी चार चौकात लागणार मिस्ट स्प्रे

Thane Mahanagarpalika

ठाणे : ठाणेकरांचा हप्पीनेस इंडेक्स वाढविण्याच्या दृष्टीकोणातून ठाणो महापालिकेने आता शहरातील धुळीच्या नियंत्रणासाठी चार चौकात मिस्ट स्प्रे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. यासाठी 1 कोटी 2 लाखांचा खर्च केला जाणार आहे.

ठाणो महापालिका क्षेत्रतील प्रदुषण कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे हवेतील धूलिकण शोषून शुद्ध हवा बाहेर सोडणारी यंत्रणा 2017 साली कार्यान्वीत केली होती. जवळपास 42 ठिकाणी अशी यंत्रे बसविण्यात आली होती. मात्र, काही काळातच काही ठिकाणची यंत्रे बंद पडल्याचे चित्र आहे. असे असतांना आता धुळीच्या नियंत्रणासाठी पालिकेने हे नवे तंत्रज्ञान हाती घेण्याचे निश्चित केले आहे. ठाणो शहरात धुळीचे प्रमाण वाढत असताना, नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होत असलेला धोका दूर करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. त्यानुसार यापूर्वी जी यंत्रे बसविण्यात आली आहेत, त्यामुळे चौकातील प्रदुषण 45 टक्के झाले असल्याचा दावा पालिकेने केला आहे. आता मात्र पालिकेने मिस्ट स्प्रे ही नवी संकल्पना स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. शहरांतील चार प्रमुख चौकांमध्ये हे 8 स्प्रे उभारले जाणार असून त्यासाठी एक कोटी दोन लाख रु पये खर्च केला जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. या यंत्रणोच्या माध्यमातून पाण्याच्या अतिसुक्ष्म थेंबांची फवारणी करून हवेतील धुलीकण नियंत्रित ठेवले जातात. या यंत्रणोमध्ये पाण्याची टाकी असते. त्यात पाणी साठवून विशिष्ठ नोझल्समधून पाण्याची फवारणी होते. ही यंत्रणा चौकांमध्ये वाहतूकीला अडथळा येणार नाही एवढ्या कमी जागेत उभारता येणो शक्य असणार असल्याचाही दावा पालिकेने केला आहे.