‘मिशन मंगल’ चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई २८ कोटींच्या घरात

Mission Mangal

मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘मिशन मंगल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कोटींचा गल्ला कमविला आहे . चित्रपटाने पहिल्याचं दिवशी २८ कोटींच्या घरात कमाई केली आहे .

भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत होता . त्यामुळेच पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

अक्षय कुमार, विद्या बालन यांची मुख्य भूमिका असलेला ‘मिशन मंगल’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो ‘मिशन मंगल’ या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे.

दरम्यान २४ सप्टेंबर २०१४ मध्ये इस्त्रोच्या महिला वैज्ञानिकांनी मंगळ ग्रहाच्या कक्षेत सॅटलाईट लॉन्च केले होते. पहिल्याच प्रयत्नात आणि कमी बजेटमध्ये ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.