
गेल्या काही काळापासून भारत-पाकिस्तानात दरम्यानच्या अघोषित युद्धावर अनेक सिनेमे आले आहे. पाकिस्तानात जाऊन गुप्त मोहिमा पूर्ण करून नायक भारतात कसा परततो हे आपण अनेक वेळा पाहिले आहे. भारतीय गुप्तहेराच्या अनेक कथा पडद्यावर मांडण्यात आलेल्या आहेत. यात आता रॉच्या एका अत्यंत अवघड, धोकादायक मिशनवर आधारित सिनेमा तयार केला जाणार असून यात सिदधार्थ मल्होत्रा रॉच्या गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचे नाव मिशन मजनू ठेवण्यात आले असून याचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.
रॉ (Raw) ने 1970 मध्ये एक अत्यंत गोपनीय अशी मोहिम आखली होती. रॉच्या एका जाबांज अधिकाऱ्याने ती मोहिम पूर्ण केली होती. त्या सत्य घटनेवर आधारित’ मिशन मजनू’ (Mission Majnu)तयार केला जाणार आहे. रॉ अधिकाऱ्यांची ही कथा रॉनी स्क्रूवाला पडद्यावर आणणार आहे. रॉनीने यापूर्वी विकी कौशलसोबत सत्य घटनेवर आधारित ‘उरी’ हा देशभक्तीने भारलेला सिनेमा दिला होता. अमर बुटाला आणि गरिमा मेहता यी सिनेमाचे सहनिर्माते आहेत. रॉ एजंटच्या भूमिकेत सिद्धार्थ खूपच आकर्षक दिसत असून त्याला 50 वर्षांपूर्वीचा लुक देण्यात आलेला दिसत आहे. या सिनेमात नायिका म्हणून साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदानाला घेण्यात आले आहे. रश्मिका या सिनेमाच्या माध्यमातून हिंदीमध्ये पदार्पण करणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला