शिवसेनेचं मिशन बेळगाव : उद्धव ठाकरेंकडून संजय राऊतांकडे मोठी जबादारी

CM Uddhav Thackeray-Sanjay Raut

मुंबई : बेळगाव लोकसभा मतदार संघाचे (Belgaum Lok Sabha constituency) भाजप (BJP) खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी (Suresh Angadi) यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला शिवसेनेने (Shivsena) पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रचाराची जबादारी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सोपवली आहे. ते लवकरच बेळगावला जाणार आहेत. खुद्द संजय राऊतांनी ट्विटरद्वारे याविषयी माहिती दिली.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी राऊत हे जाहीर सभा आणि रोड शो करणार आहेत. संजय राऊत बुधवारी सकाळी बेळगावात दाखल होतील. त्यानंतर त्यांचा रोड शो होईल. संध्याकाळी रेल्वे फ्लाय ओव्हर ब्रीज जवळ असलेल्या मराठा मंदिर हॉलमध्ये राऊत जाहीर सभेला मार्गदर्शन करतील.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भाजपची बैठक सुरु आहे. प्रत्येक गाडीस्वाराला पाचशे रुपये आणि पेट्रोल दिलं जात आहे. इथल्या लोकांना विचारा, कुणाला एक नवा पैसा मिळाला आहे का? ही आहे महाराष्ट्र एकीकरण समिती. एका सन्माननीय व्यक्तीने काहीतरी गणित घातलेलं कानावर आलं. गेल्या विधानसभेला सगळ्या मतदारसंघातून मिळून सत्तर हजार मतं यांना पडली. आम्ही याआधीही जिंकलोय आणि आताही आमचा विजय निश्चित आहे, बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समीतीचे उमेदवार शुभम शेळके यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. शिवसेनेचा त्यांना पाठिंबा आहे. मी स्वतः त्यांच्या प्रचारासाठी १४ तारखेला बेळगावला पोहोचत आहे, असे लिहित संजय राऊत यांनी उमेदवाराचा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या १७ एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून २ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button