‘मिशन बिगेन अगेन’मधील प्रतिबंध शिथिल करा ; व्यापारी संघटनेची शरद पवारांकडे मागणी

Mission Begin Again-sharad pawar

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ची (Mission Begin Again) घोषणा केली. या मिशन बिगीन अगेनबाबत जारी केलेल्या नियमाचा व्यापारी संघटनेने (trade association) विरोध केला . राज्यात महाराष्ट्र सरकारने मिशन बिगईन अगेनसाठी नवीन परिचालन मार्गदर्शक सूचना जारी केल्याच्या दुसर्‍याच दिवसानंतर व्यापारी संघटनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली.

ही बातमी पण वाचा:- १ तारखेपासून सर्व दुकाने उघडा, लॉकडाऊनवरून प्रकाश आंबेडकर आक्रामक

फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या ७८१ व्यापारी संघटनांच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी दक्षिण मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली . यावेळी यांनी दुकाने सोमवार ते शनिवार पर्यंत खुले ठेवण्याची मागणी पवारांना केली . नवीन नियमावलीनुसार व्यापाऱ्यांना आठवड्यातून फक्त ३ दिवस दुकाने खुले ठेवण्याचे नमूद करण्यात आले आहे .

काही दिवसांपूर्वी एफएएमने यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते आणि 1 ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वी त्याची पूर्तता न झाल्यास “असहकार आंदोलन” करण्याची धमकीही दिली होती. परंतु सार्वजनिक व आर्थिक उपक्रम सुरू करण्याच्या ताज्या मार्गदर्शक सूचना जाहीर झाल्यावर सरकारने बुधवारी शिथिलता जाहीर केली नाही. त्यामुळे व्यापारी संघटनेने आपल्या अडचणी शरद पवारांकडे मांडल्या . हे पाहता आता पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER