मनसुख हिरेनच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही फुटेज गहाळ, डीव्हीआर गायब?

Mukesh Ambani - CCTV - Mansukh Hiren - Maharashtra Today

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा घराजवळ जिलेटीनच्या कांड्या ठेवलेली कार ज्याची होती असे सांगितले जाते आहे त्या मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) मुख्यालयातील काही दिवसांचा सीसीटीव्ही डेटा आणि सीसीटीव्ही फुटेज स्टोअर केलेला डीव्हीआरही गायब झाला आहे.

या प्रकरणाचा तपास नुकताच एटीएसकडून एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले की, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर हा सीसीटीव्ही डेटा गहाळ झाला आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेज स्टोअर केलेला डीव्हीआरसुद्धा ( Digital Video Recorder) गायब झाल्याचे सांगण्यात येते आहे. या नव्या माहितीमुळे राज्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अजून हाती आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER