… नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला! भातखळकरांचा वायकरांना टोमणा

Ravindra Waikar-Atul bhatkhalkar

मुंबई :- ईडी (अंमलबजावणी संचालनालया)ने संजय राऊत (Sanjay Raut) यांची पत्नी वर्षा राऊत यांना नव्याने समन्स बजावले आहे. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी वर्षा याना ५ जानेवारी रोजी ईडीच्या कार्यालयात हजर व्हायचे आहे.

पीएमसी बँक घोटळ्याची चौकशी करा, अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेचे नेते व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी थेट पंतप्रधान मोदींना पाठवले होते. यावरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी वायकरांना टोमणा मारला, भाजपावर शरसंधान केल्याचा आव आणत रवींद्र वायकर यांनी PMC बँक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. घोटाळ्यात राजकीय नेते असल्याचा त्यांचा कयास अगदी योग्य होता, फक्त त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला! असे ट्विट भातखळखर यांनी केले.

वायकर यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेले पत्र देखील भातखळखर यांनी ट्विटसोबत जोडले आहे.

ही बातमी पण वाचा : आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही- देवेंद्र फडणवीसांचा सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER