मिसमॅच सई

Sai Tamhankar

आजकाल कोणत्याही कार्यक्रमांमध्ये थीमला फार महत्त्व आहे. गेट-टुगेदर असो किंवा छोटीशी पार्टी असो एक थीम ठरवायची आणि त्यानुसार सगळ्यांनी त्या पार्टीमध्ये सहभागी व्हायचं यामध्ये एक वेगळीच मजा असते. त्यासाठी कलर थीमचा जो रंग असेल त्या रंगाचे ड्रेस कसा निवडायचा, लूक कसा करायचा याचं प्लॅनिंग जोरदार सुरू होतं. पण अशा थीम पार्टीमध्ये ठरलेल्या थीमच्या रंगापेक्षा वेगळ्याच रंगाचा ड्रेस घालून जर कोणी आलं तर अशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणाल ? मिसमॅच हो ना! असच मिसमॅच करण्यात एक अभिनेत्री तरबेज आहे आणि तिचं नाव आहे सई ताम्हणकर (Sai Tamhankar). तिच्या या विचित्रपणाची आता तिच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींना इतकी सवय झाली आहे की ठरलेल्या थीमकलरपेक्षा सई वेगळच काहीतरी करणार हे त्यांनी गृहित धरले आहे. ही गोष्ट सईने सांगितलेली नाही तर तिचा इंडस्ट्रीमधला मित्र आणि तिच्या अनेक सिनेमाचा दिग्दर्शक असलेल्या संजय जाधव याने हा पर्दाफाश केला आहे.

मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर ही वैयक्तिक आयुष्यातही तितकीच बिनधास्त आहे. कोणतीही भूमिका निवडत असताना तो बिनधास्तपणा तिच्या भूमिकेमध्ये दिसत असतो. अर्थात एक कलाकार म्हणून जर तिच्या वाट्याला गंभीर भूमिका आली तर ती देखील ती नक्कीच कसदारपणे करेलच पण सईचा मूळ स्वभाव हा थोडासा प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या स्वभावांपैकी आहे. खरेतर सईची अशा पद्धतीची सवय तिच्या चाहत्यांना की प्रेक्षकांना माहिती नव्हती. एका कार्यक्रमात गप्पा मारण्याच्या नादात संजय जाधवने सईची ही अफलातून सवय सगळ्यांना सांगितली. सईनेही दिलखुलासपणे हे मान्य करत, हो, मला एखाद्या थीम पार्टीमध्ये त्या ठरलेल्या थीमच्या विरोधातच काहीतरी करायला खूप आवडतं असं सांगितलं. अर्थात सगळ्यांपासून वेगळेपणा दाखविण्यासाठी किंवा त्यांच्यात सहभागी होण्याचा आपला मूड नाही हे दाखवण्यासाठी नाही तर मला त्यातून मिळणारा आनंद व माझ्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर जे भाव निर्माण होतात ते बघायला मला फार आवडतं. पण हो ,जो रंग पार्टीमध्ये ठरलेला असतो त्या रंगाचा कुठे ना कुठे तरी स्पर्श माझ्या ड्रेस मध्ये किंवा माझ्या लूकमध्ये असतो. त्यामुळे अगदीच काही मी थीमविरोधात जाते असं नाही. पण हो मला हे करायला खूप मजा येते.

यासंदर्भातला किस्सा सांगताना सई म्हणाली, एक पार्टी होती ज्यासाठी रेड आणि ब्लॅक कलर दिला होता. अर्थातच त्या पार्टीमध्ये रेड आणि ब्लॅक कॉम्बीनेशनचाड्रेस घालून जायचं होतं. त्या दिवशी त्या पार्टीची ती कलर थीम होती. रेड आणि ब्लॅक कंबिनेशनच्या त्या पार्टीत जाण्यासाठी मी तयार झाले. पण मी गुलाबी रंगाचा टॉप घातला ज्याच्यावर रेड कलरचे स्पॉट होते आणि रेड कलरचे शूज घातले होते ज्यावर ब्लॅक रंगाची बॉर्डर होती. माझ्या पार्टी लूकमध्ये लाल रंग आणि काळा रंगही होता पण डोळ्याला दिसताना तो जास्त गुलाबी रंग दिसत दिसत होता. त्यावरून मला सगळ्यांनी भंडावून सोडलं कि आजच्या पार्टीमध्ये रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन कलर थीम होती आणि तू गुलाबी रंगाचा ड्रेस घालून का आली आहे ? तेव्हा मी त्यांना गुलाबी रंगाच्या ड्रेसवर असलेले रेड स्पॉट दाखवले इतकेच नव्हे तर माझ्या शूजला ब्लॅक बॉर्डर होती तिच्याकडे लक्ष वेधलं. पण सगळ्यांनीच डोक्याला हात लावला. सई म्हणजे कुठल्याही कलर थीम असलेल्या पार्टीमध्ये काहीतरी विचित्र करून जात असते. असं झालंय की तिला सांगायलाच नको. तिने जे ठरवलेले असते तेच घालून ती पार्टीला येते असं माझ्याविषयी मत झालं आहे. पण तरीदेखील मला कोणीही पार्टीला चुकवत नाही. माझ्यासाठी ही गोष्ट खूप चांगली आहे की मी कलर थीम कधीच फॉलो करत नाही तरीदेखील माझ्या फ्रेंड्स पार्टीला बोलवायचं विसरत नाहीत.

मालिका सिनेमा यामधून सई ताम्हणकर हिने गेल्या काही वर्षात तिचा फॅन फॉलोइंग कमालीचा वाढवलेला आहे. सध्या ती साडीचा एक ब्रँड चालवत असून या ब्रँडच्या माध्यमातून वेगवेगळ्या साड्या डिझाईन करते. स्वतः खूप फॅशन फंडा असलेली अभिनेत्री आहे. तिच्या स्टाइल्स अनेक मुली फॉलो करत असतात पण जेव्हा कलर थीम असलेल्या पार्टीमध्ये सई पोहोचते तेव्हा पार्टीतल्या कलरथीमशी तिच्या लूकचा काहीही संबंध नसतो तरीही सगळ्यांचे लक्ष ती वेधून घेते.

ही बातमी पण वाचा : सोनाली पोहोचली भलतीकडेच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER