कोलांटउडीचे बादशहा, करप्शन क्वीनला शरण; भाजपची संजय राऊतांवर मिस्कील टीका

Keshav Upadhye - Sanjay Raut - Maharashtra Today

मुंबई : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वच ठिकाणी काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकांच्या निकालांचे आत्मचिंतन करण्यासाठी झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या (Congress) अध्यक्ष सोनिया गांधी यांनी खंत व्यक्त केली होती. तसेच काँग्रेसमध्ये बदलांची आवश्यकता असल्याचं निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट होत असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, शिवसेनेनं या बैठकीनंतर आपल्या सामनाच्या अग्रलेखात या बैठीतील काही मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. यावरून भाजप (BJP) महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी टोला लगावला आहे. ‘करप्शन क्वीन ते सोनियाचा संदेश. अग्रलेखांचा बादशाह माहीत होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले. कोलांटउडीचे बादशहा, करप्शन क्वीनला शरण. ’ असं म्हणत केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नावाचा उल्लेख न करता मिस्कील टीका केली.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button