गर्भोपघातकर भाव – गर्भिणीने टाळणे आवश्यक!

आयुर्वेदात बाळ होण्यापूर्वी बीजशुद्धी, आहार विहार योजना पतीपत्नींकरीता जेवढे महत्त्व आहे तेवढेच गर्भावस्थेत काळजी मासानुमासिक आहारविहार या गोष्टींना देखील तेवढेच महत्त्व आहे. ९ महिन्याचा गर्भकाळ हा काळजी घेण्याचा, आनंदी राहण्याचा तसेच बाळाच्या विकासाला कुठेच इजा होऊ नये याकरीता विशेष लक्ष ठेवण्याचा आहे. गर्भावस्थेत आईचे डोहाळे (Pregnant Women) पुरवावे हे आवश्यक आहे ते बाळाला आईला अहितकर असेल तर युक्तिने त्या डोहाळ्यांना हितकर गोष्टीत बदल करून वापरावे.

आयुर्वेदात गर्भोपघातकर भाव हे विशेषतः सांगितले आहेत. गर्भ + उपघातकर (Miscarriage) म्हणजेच गर्भाला नष्ट करणारे, गर्भस्राव करणारे किंवा गर्भ वाढीला नुकसान करणारे घटक या गोष्टींचा विचार यामधे केला आहे.

आई होणार ही गोड, आनंदाची बातमी कळली की घरातल वातावरणात एकदम बदल घडतो. मोठ्यांच्या सूचना, शरीरातील बदल, त्रास, भीती, आनंद अशा संमिश्र भावना स्त्रीला जाणवतात. पहिले तीन महिने जपावे हे प्रत्येकजण सांगत असतो. पण जपावे म्हणजे नक्की काय करायचे, त्याने काय होते ही बेफीकीरी कधी कधी गर्भ व गर्भिणीला त्रासदायक वेदनादायी ठरू शकते. बघूया आयुर्वेदाचा (Ayurveda) हा विचार त्या मागची कारणमिमांसा.

आयुर्वेद संहितेत आईचे हावभाव, सवयी, आहार, मानसिक स्थिती याचा परीणाम बाळाच्या वाढीवर कसे व काय परीणाम करतात याचेही वर्णन केले आहे.

 • आहारविषयक – पचायला जड, उष्ण मसालेयुक्त, तीक्ष्ण आहाराचे सेवन, मद्यपान करू नये.
  उत्कट, असमतल, कडक आसनावर सतत व जास्त वेळ बसणे.

मलमूत्राचे वेग अडविणे, अति व्यायाम परिश्रम करणे –

 • उपरोक्त कारणांनी गर्भपात किंवा अकाल प्रसव होऊ शकतो.
 • रोज उताणे झोपणे. सहसा एका कुशीवर झोपावे. सतत उताणे झोपल्याने बाळाच्या मानेभोवती नाळ येऊ शकते.
 • जी गर्भिणी सतत शोकग्रस्त असते तिचे बाळ घाबरट, कृश व अल्पायु असते.
 • अतिमैथून किंवा सतत सहवासात रत राहणाऱ्या स्त्रीची संतती विकारयुक्त, निर्लज्ज, स्त्रीवश होते.
 • अधिक झोपणाऱ्या गर्भवती स्त्रीचे बाळ मंदाग्नियुक्त, आळशी, मंद उत्पन्न होते.
 • मद्यपान अतिसेवन करणाऱ्या गर्भवतीचे बाळ चंचल, अल्प स्मरणशक्ति युक्त असते.
 • केवळ गोड पदार्थ , मधुररसयुक्त असणारे आहाराचे सेवन करणाऱ्या गर्भिणीच्या बाळाला पुढे प्रमेह, स्थौल्य, तोतडेपणा हे विकार होतात.
 • जी गर्भिणी आंबट रसयुक्त पदार्थाचे सेवन सतत व जास्त प्रमाणात करते तिच्या बाळात रक्तपित्त, त्वचाविकार, डोळ्यांचे विकार होतात.
 • जी गर्भिणी मीठ वा खारट पदार्थ जास्त प्रमाणात घेते त्या बाळात केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, सुरकुत्या येणे हे रोग होतात.
 • अतितिखट पदार्थ सतत आहारात घेतल्याने बाळाला दुर्बलता, अल्प शुक्रता, अनपत्य हे विकार होऊ शकतात.
 • आहार हा षड रसात्मकच असावा त्यामुळे कोणताही एकच रस जास्त घेणे हे विकृती निर्माण करणारेच आहे

अशाप्रकारे गर्भाला उपघात व हानी पोहचविणारे इतरही घटक आयुर्वेदात सांगितले आहेत. गर्भावस्थेचा हा दृष्टीकोण नक्कीच तज्ज्ञांकडून समजून घ्यावा. निरोगी संतती होण्याकरीता गर्भोपघातकर घटकांचा विचार खूप गरजेचा ठरतो.

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

 

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER