सुधारित ‘तेजस’ घेणार मिराज आणि मिगची जागा

tejas-fighter-planes

बंगळूरू :- तेजस लढाऊ विमानात तांत्रिक सुधारणा करून तेजस एमके – २ चे फेब्रुवारी २०२० पासून उत्पादन सुरू होणार आहे. हे विमान हवाईदलात फ्रेंच बनावटीच्या मिराज-२००० आणि रशियन मिग-२९ फायटर विमानांची जागा घेईल. याबाबत माहिती देताना, एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे संचालक डॉ. गिरीश देवधर यांनी सांगितले की, तेजसचे एमके-२ व्हर्जन शक्तिशाली रडारसह अत्याधुनिक सेन्सर्सनी सुसज्ज आहे.

‘ब्रह्मोस’साठी फिलीपाईन्स ठरू शकतो भारताचा पहिला खरेदीदार

या फायटर जेटच्या एव्हिऑनिक्स सिस्टिममध्ये सुधारणा करण्यात आली असून ते दृष्टीपलीकडच्या लक्ष्याचा वेध घेईल. एमके -१ आणि एमके – १ ए पेक्षा तेजस एमके– २ ची इंधन टाकी मोठी असून त्यावरून ते जास्त शस्त्रास्त्रे वाहून नेईल. इंडियन एअर फोर्स तेजस एमके – १ आणि एमके – २ व्हर्जनची १२३ विमाने विकत घेणार आहेत. जुन्या झालेल्या फायटर विमानांच्या जागी स्वदेशी बनावटीची विमाने विकत घेणार असल्याचे आएएफकडून सरकारला सांगण्यात आले आहे.