अमेरिकन निवडणुकीत मीरा नायरचा मुलगा विजयी

Mira Nair's son wins US election

प्रख्यात दिग्दर्शक मीरा नायर (Mira Nair) यांच्या मुलाने जोहरानममदानीने (Johran Mamdani) अमेरिकेच्या निवडणुकीत ( US election) विजय मिळवून इतिहास रचला आहे. त्याने न्यूयॉर्क स्टेट अॅसेंब्ली सीटवर विजय प्राप्त केला आहे. या सीटवर विजय मिळणारी  पहिली साऊथ एशियन व्यक्ती बनण्याचा विक्रमही जोहरानने केला आहे. न्यूयॉर्कच्या ३६ वा अॅसेंब्ली जिल्हा अॅस्टोरिया येथून बिनविरोध विजय प्राप्त केला आहे.

या विजयाने आनंदित झालेल्या जोहरानने स्वतःच सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. स्वतःच्या फोटोसह विजयाचा आनंद जाहीर करीत जोहरानने म्हटले आहे, अधिकृतरीत्या माझा विजय झाला आहे. आम्ही श्रीमंतांवर टॅक्स लावण्यासाठी, रुग्णांना बेर करण्यासाठी, गरिबांना घरे मिळवून देण्यासाठी आणि समाजवादी न्यूयॉर्क बनवण्यासाठी अल्बानीला जात आहे. मात्र हे काम मी एकटा करू शकत नाही.

यासाठी एका मोठ्या आंदोलनाची गरज आहे. जोहरानचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. जोहरानचा जन्म युगांडाच्या कंपालामध्ये झाला होता. त्यानंतर त्याचे कुटुंबीय जोहरान सात वर्षांचा असताना न्यूयॉर्कमध्ये आले होते. आठ  वर्षीय जोहरान ममदानी एक रॅपर आणि हाउसिंग कौन्सिलर आहे. त्याने रॅप व्हिडीओ नानी बनवला आहे. त्याला लेफ्ट विंग डेमोक्रेटिक पार्टी आणि डेमोक्रेटिक सोशलिस्ट अलायन्सचे समर्थन मिळाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER