मीरा भाइंदर : ३७ नवे रुग्ण आढळलेत

Corona Virus Positive

मुंबई : मीरा भाइंदर मनपा क्षेत्रात गुरुवारी कोरोनाचे ३७ नवे रुग्ण आढळलेत. यात १४ रुग्ण कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात होते. रुग्णांचा एकूण आकडा ८५७ झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ४४ आहे.

दरम्यान मनपाने लॉकडाऊनमध्ये सवलत देण्याची घोषणा केली आहे. सध्या किराणा, धान्य व जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद आहेत. सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत फक्त घरपोच सेवेत वस्तूंचा पुरवठा सुरू आहे. शाळांची पुस्तके, रेनकोट-छत्र्या, हार्डवेअर, रंग, चष्म्याची दुकाने उघडली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER