बालिकेचा खून करणारा अल्पवयीन : लैंगिक अत्याचार करून खून केल्याची कबुली.

murder

सांगली : तुंग येथील चांदोली वसाहतमधील बालिकेच्या खुनाचा छडा शनिवारी लागला . पहिलीत शिकणाऱ्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचा खून करणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराला ताब्यात घेऊन पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली. बालन्याय अधिनियमातील तरतुदींना अधीन राहून त्या बालगुन्हेगाराची चौकशी करण्यात आली असल्याचेही पिंगळे यांनी सांगितले .

मिरज तालुक्यातील तुंग नजिकच्या चांदोली वसाहतीजवळच्या ऊसाच्या शेतात 21 मे रोजी एका ८ वर्षीय लहान मुलीच्या खुनाची घटना घडली होती. या घटनेबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले , पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील श्रीकांत पिंगळे तसेच त्यांचेकडील पथक व सांगली ग्रामीण पोलीस, शहराचे निरीक्षक अजय सिंदकर आणि त्याांचे कर्मचारी चांदोली वसाहत मधील वासु पाटील यांचे ऊसाचे शेतामध्ये तपास कामी दाखल झाले होते. सदर गुन्हयातील आरोपीचा तपास लागेपर्यंत वरील पथकांचा तुंग येथे मुक्काम होता.

शनिवारी संबधित लहान मुलगी ही घरातून दुकानाकडे खाऊ आणणेसाठी गेली असता दुकानाच्या पाठीमागील बाजूस ऊस पिकाचे चेंबर जवळ अल्पवयीन मुलगा हा त्या मुली सोबत खेळत असल्याची माहिती मिळाली. सदरचा मुलगा अल्पवयीन असल्याने बालन्याय अधिनियम मधील तरतुदीचे पालन करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याचेकडे विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्याने त्याच्याकडील अश्लिल फिल्म त्या मुलीस दाखवून तिचेवर लैंगिक अत्याचार करून, दगडाने डोक्यात दुखापत करुन तिचा तिच्याच लेगीजने गळा आवळून खुन केल्याच्या गुन्हयाची कबूली दिली आहे . त्याच्याकड़न गुन्हयामध्ये वापरलेला मोबाईल व गुन्हयाचे वेळी अंगावर असणारे कपडे जप्त करण्यात आले आहेत . या गुन्हयाचा तपास पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर हे करीत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER