खासगी अकादमींसाठी क्रीडा मंत्रालयाची प्रोत्साहन योजना

Sports Minsitry

क्रीडा मंत्रालयाने (Sports ministry) 500 खाजगी क्रीडा अकादमींसाठी (private sports academies) प्रोत्साहन योजना (Incentive scheme) जाहीर केली आहे. त्याद्वारे या अकादमींना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. 2028 च्या आॕलिम्पिकसाठी प्राधान्य यादीत जे 14 क्रीडाप्रकार आहेत ते या सहाय्यासाठी पात्र असणार आहेत. खेलो इंडियाअंतर्गत (Khelo India) 2020-21 पासून पुढील चार वर्षे हे अर्थसाहाय्य मिळणार आहे.

यात त्या अॕकेडमींनी प्रशिक्षित केलेल्या खेळाडूंचे यश आणि त्यांची गुणवत्ता, अकादमीत उपलब्ध प्रशिक्षकांचा दर्जा, सोयीसुविधांची उपलब्धता, क्रीडा वैद्यक व क्रीडा विज्ञान सुविधा व कर्मचारी वर्ग याआधारे खासगी अकादमींची दोन वेगवेगळ्या श्रेणीत वर्गवारी करण्यात येणार आहे.

या निर्णयाबद्दल क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितले की देशातील क्रीडा प्रतिभेला देशाच्या कानाकोपऱ्यात प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी या संस्थांना पाठबळ देण्याची गरज आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात बऱ्याच छोट्यामोठ्या अकादमी आहेत ज्या प्रतिभा हेरण्याचे आणि खेळाडूंना प्रशिक्षित करण्याचे चांगले काम करित आहेत. अशा अकादमींना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे, त्याद्वारे त्यांना खेळाडूंना उत्तमोत्तम प्रशिक्षणासाठी सोयीसुविधा व संसाधने वाढविण्यास मदत हौणार आहे.

या योजनेसंदर्भात आॕलिम्पिकपटू नेमबाज गगन नारंग याने म्हटलेय की, ह्या योजनेमुळे खाजगी अकादमींना मोठी चालना मिळणार आहे, त्यांना जागतीक दर्जाच्या सोयीसुविधा उभारण्यास आणि संसाधने जुळवण्यास मदत होणार आहे. गगन नारंग याची स्वतःची गन फॉर ग्लोरी नावाची खासगी अकादमी आहे.

क्रीडा प्राधिकरण व राष्ट्रीय क्रीडा महासंघ यावर काम करुन योजनेचे नेमके स्वरुप ठरवणार आहेत. त्यात प्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी क्रीडा विज्ञान सुविधा उपलब्ध कराण्यावर जोर असणार आहे. बॕडमिंटन प्राशिक्षक पी. गोपीचंद यांनी या योजनेसाठी सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाला धन्यवाद दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, हा अतिशय चांगला उपक्रम आहेआणि त्याचा खेळांना व खेळाडूंना फार फायदा होणार आहे. हे पुढच्या दिशेने टाकलेले एक अतिशय महत्त्वाचे पाउल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER