‘ठाकरे’ सरकाराच्या वजनदार मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात लसी पळवल्या, निलेश राणेंचा आरोप

Nilesh Rane-CM Uddhav Thackeray.jpg

मुंबई : सध्या राज्यात कोरोनाचे रूग्ण (Corona patient) वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये औषधी, ऑक्सिजन आणि रेमडीसिवीर इंजक्शनचा तुटवडा जाणवत आहेत. रेमडीसिवीरच्या वाटपावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद होताना दिसत आहेत, अशातच माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे सरकारमधील काही वजनदार मंत्री रेमडीसिवीर इंजक्शन (Remedicivir injection) आपल्या जिल्ह्यात पळवत असल्याचा आरोप केला आहे.

बातमी अशी आहे की अक्षरशा वजनदार मंत्र्यांनी लसी आपल्या जिल्ह्यात पळवल्या. ठाकरे सरकारमध्ये ज्या मंत्र्यांचं वजन आहे त्यांच्या जिल्ह्यांना सर्वाधिक लस मिळाल्या. लस वाटपामध्ये घोळ झाला आहे, ज्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत असे म्हणत प्रत्येक जिल्ह्याला किती लस मिळाल्या ते जाहीर करा, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

तसेच कोकणाचे आमदार भास्कर जाधव म्हणतायत मोठ्या हॉस्पिटलची कोकणात गरज नाही. असे विद्वान आमदार जोपर्यंत कोकणात निवडून येतील तोपर्यंत कोकणी लोकांचं काही खरं नाही. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांवर आमदारांना घाम फुटला कारण कधी काही केलंच नाही, काम केलं असतं तर चोक उत्तर देऊ शकले असते, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button