नव्या कृषी विधेयकासंदर्भात आघाडी सरकारचे मंत्री पवारांच्या भेटीला

मुंबई : केंद्र सरकारने (Central Govt) लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात अद्यापही हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. इतर काही राज्यांसह महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनेही केंद्र सरकारचा कृषी कायदा राज्यात लागू न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शेतीवर कायदा करताना अनेक राज्यांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध बघता आता महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मंत्र्यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.

बुधवारी महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्र सरकारच्या नवीन कृषी सुधारणा विधेयकासंदर्भात शरद पवार यांच्याशी विस्तृत चर्चा केली आहे. त्यावर शरद पवारांनी काही सुचना केल्या असल्याची माहिती बाळासाहेब थोरात आणि दादा भुसे यांनी दिली.

नव्या कृषी विधेयकासंदर्भात आज आम्ही शरद पवार यांची भेट घेतली. केंद्राने कृषीचे कायदे पास केले त्यात अनेक त्रुट्या आहेत. त्यात शेतकऱ्यांना मदत करायची आहे. कायद्यात दुरुस्ती करायची आहे, याबाबत चर्चा झाली. केंद्राच्या कायद्यातील तरतुदीबाबत चर्चा केली. कायद्यात जी दुरुस्ती करायची आहे ती केली जाणार असून ५ जुलै पावसाळी अधिवेशनात कायदा आणणार आहोत, असंही थोरात यांनी सांगितलं.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button