प्रदेशाध्यक्षपदी थोरातच हवेत; कॉंग्रेस मंत्र्यांनी प्रभारींसमोर घेतली भूमिका?

Balasaheb Thorat

मुंबई :- काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष बदलू नका, राज्यातील घडी बसलीय, बहुतांश मंत्र्यांनी ही भूमिका काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या समोर मांडली आहे. सरकार स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील समोर आहेत, अशा वेळी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना आता बदलण्याचे औचित्य किंवा कारण दिसत नाही. अशी भूमिका अनेक मंत्र्यांनी काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या समोर मांडली. दोन दिवस एच.के. पाटील हे मुंबईत येऊन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी कोण असावे याची चाचपणी करत आहेत. सकाळपासून त्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांबरोबर वैयक्तिक संवाद साधला.

दरम्यान, विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी बिगर मराठा नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याबाबतही काँग्रेसमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. बिगर मराठा नेत्यांमध्ये राज्यसभा खासदार राजीव सातव, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) यांच्या नावाची चर्चा आहे.

ही बातमी पण वाचा : थोरातांनी स्वत:चं नाव विजय ऐवजी बाळासाहेब केले , पण औरंगाबादच्या नामकरणाला विरोध : भाजप नेत्याची टीका 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER