ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर मंत्र्याच्या गाड्या पेटवू; बाळासाहेब सानप यांचा इशारा

balasaheb sanap

बीड : आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका आहे. मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर मंत्र्याच्या गाड्या पेटवून देऊ,’ असा इशारा जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व ओबीसी नेते बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी दिला.

सानप आज बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा समाजाने आरक्षणासाठी मोर्चे काढले तेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो. मात्र मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या. ओबीसीमध्ये आधीच अनेक जाती असल्याने आरक्षण पुरत नाही, ओबीसीमध्येच मारामारी सुरू आहे, असे सानप म्हणाले.

ओबीसी नेत्यांनो शेपूट घालून बसू नका

बाळासाहेब सानप यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांवरही टीका केली. म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नका. याबाबत मागणी सुरू असताना ओबीसी नेत्यांनी शेपूट घालून बसू नये. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला व ओबीसीचे मंत्री जर गप्प बसले तर सुरुवातीला या मंत्र्यांना राज्यामध्ये फिरु देणार नाही. मंत्र्यांनी बळ वापरण्याचा प्रयत्न केला तर मंत्र्यांच्या गाड्या पेटवू,’ असा इशारा सानप यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER