
चंद्रपूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतअसताना आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच त्यांना डॉक्टरांनी विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. चिंतेची बाब म्हणजे सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी सभागृहातही हजेरी लावली आहे. त्यामुळे आणखीनच चिंता वाढली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार विजय वडेट्टीवार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वडेट्टीवार हे सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यस्त आहे. त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विलगीकरणात होण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या १ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला