सरकारची तिजोरी रिकामी, मात्र मंत्र्यांच्या दालनावर ९० कोटींचा खर्च

सरकारची तिजोरी रिकामी, मात्र मंत्र्यांच्या दालनावर ९० कोटींचा खर्च

मुंबई : कोरोना (Corona) महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे (Lockdown) राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा परिणाम झाला. सरकारी तिजोरी रिकामी झाली. मात्र असे असतानाही दुरुस्तीच्या नावाखाली मंत्र्यांचे बंगले चकाचक केले जात आहे. यासाठी तब्बल ९० कोटींचा खर्च केला जातोय अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. बंगल्याचे काम सुरु असताना महागड्या वस्तू वापराव्या असा दबाव मंत्री आणि त्यांचे पीए, पीएस आणतात असे दिसून आलं. यावरुन विरोधी पक्ष भाजपने (BJP) सरकारवर निशाणा साधलाय.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या चित्रकूट बंगल्यावर ३ कोटी ८९ लाख इतका सर्वाधिक खर्च झाला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) वर्षा बंगल्यावर ३ कोटी २६ लाख इतका खर्च झाला आहे. कोरोना काळात राज्यावर आर्थिक ताण असताना जनतेच्या कराच्या पैशांतून अशाप्रकारची हौस पूर्ण करणं योग्य आहे का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

शेवटी सरकार कोणाचेही असो चूक ही चूक आहे. अशाप्रकारच्या खर्चांमध्ये ताळमेळ असावा. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर असे खर्च दुर्लक्षित होतात. हा अनावश्यक खर्च आहे. हा खर्च होऊ नये यासाठी भाजप भूमिका घेईल. हा खर्च जनतेच्या पैशातून होतोय. कोणाच्यातरी सांगण्यावरुन खर्च होतोय असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. सरकारकडून यावर अद्याप कोणते स्पष्टीकरण आले नाही.

कोणत्या बंगल्यावर किती खर्च…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा – ३ कोटी २६ लाख

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगिरी -१ कोटी ७८ लाख

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा रॉयलस्टोन – २ कोटी २६ लाख

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा मेघदूत – १ कोटी ४६ लाख सामाजिक न्यायमंत्री

धनंजय मुंडे यांचा चित्रकूट -३ कोटी ८९ लाख

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा शिवनेरी -१ कोटी ४४ लाख

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा रामटेक – १ कोटी ६७ लाख

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा बी ३ – १ कोटी ४० लाख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा सातपुडा – १ कोटी ३३ लाख

नितीन राऊत यांचा पर्णकुटी – १ कोटी २२ लाख

एकनाथ शिंदे यांच्याकडील अग्रदूत आणि नंदनवन – २ कोटी ८० लाख रुपये खर्च

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER