मंत्री राजेंद्र शिंगणेंकडून आधी भाजप नेत्यांच्या कार्यांचे समर्थन, आता घुमजाव…

Dr Rajendra Shingane

मुंबई: मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांची चौकशी केल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध खात्याच्या मंत्र्यांच्या सहमतीनेच रेमडेसिवीरची खरेदी केली जाणार होती, असा दावा भाजपाकडून करण्यात आला होता. तसेच अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे ( Rajendra Shingane)यांनीही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिले होते.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर गेल्या आठवड्यात मला येऊन भेटले होते. राज्यात रेमेडीसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. ते दमणमधील कंपनीतून रेमेडीसिवीर आणून राज्यातील जनतेला देणार होते. अर्थातच त्यांना ते थेट जनतेला वाटता येत नाहीत. ते सरकारलाच द्यावे लागतात.त्यानुसार हे इंजेक्शन सरकारला दिले जाणार होते असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. मात्र आता राजेंद्र शिंगणे यांनी घुमजाव केले आहे. शिंगणे यांनी मंगळवारी रात्री एक व्हीडिओ ट्विट करत आपली भूमिका मांडली.

भाजपाकडून करण्याता आलेला दावा राज्याचे अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी फेटाळून लावला आहे. भाजपातील काही लोक माझ्या नावाचा अपप्रचार करत आहे त्यानिमित्ताने हा खुलासा देत आहे. भाजप रेमडीसीविर विकित घेऊन मला देणार होते अशी उलट सुलट चर्चा समाज माध्यम व सोशल मीडिया वर सुरू असून ते सपशेल चुकीचं आहे. कुठल्याही पक्षाला रेमडीसीविर वैयक्तिक रित्या विकता येत नाही किंवा वाटता येत नाही ते त्यांना सरकारलाच द्यावे लागतील, असे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर वाटण्याचा अधिकार नाही. भाजपाच्या काही लोकांनी त्यांच्या पुरवठादारांकडून रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी संपर्क केला होता. तुम्ही आमच्या सप्लायरकडून रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी करावीत, असे त्यांनी मला सांगितले. आता ते मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभाग रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करेल, असा इशाराही शिंगणे यांनी दिला. त्यामुळे आता भाजपचे नेते यावर काय उत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

ही बातमी पण वाचा : फडणवीसांवरील आरोपांची हवा राजेंद्र शिंगणे यांनी काढली नवाब मलिक तोंडावर पडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button